स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -1 - Maths & Resoning

1) 27 ही संख्‍या 27 वेळा लिहून बेरीज केल्‍यास बेरीज किती?

    Explanation: 27 x 27 = 272 = 729


    2) 33 ही संख्‍या 18 वेळा लिहून बेरीज केल्‍यास बेरीज किती?

      Explanation: 33 x 18 = 594


      3) एका शाळेत मुलांच्‍या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्‍येक रांगेत आहेत. मध्‍यभागी असलेल्‍या रामचा क्रमांक 12 वा आहे तर एकूण शाळेतील मुले किती?

      Explanation: मध्‍यभागी असलेला क्रमांक 12
      ∴ 12 x 2 – 1 = 23
      प्रत्‍येक रांगेत 23 मुले व 23 रांगा
      ∴ 23 x 23 = 529


      4)एका जंगलात जेवढ्या झाडांच्‍या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्‍येक रांगेत आहेत जर एकून झाडांची संख्‍या 8464 आहे तर झाडांच्‍या रांगा किती?

      Explanation: \[\sqrt{8464}=92\]


      5) 252 या संख्‍येला कोणत्‍या संख्‍येने गुणावे म्‍हणजे येणारी संख्‍या पुर्ण वर्ग असेल?

        Explanation: 252 चे अवयव = 2 x 2 x 3 x 3 x 7 यात 7 ला जोडीदार नाही म्‍हणून 7 ने गुणावे लागले.


        6) एका कॉलनीत जेवढी घरे आहेत त्‍याच्‍या 13 रक्‍कम गणपतीची वर्गणी प्रत्‍येक घरातून घेतात जर एकूण वर्गनी रुपये 24300 जमली तर कॉलनीतील एकूण घरे किती?

          Explanation: समजा कॉलनीत एकून घरे x
          गणपतीची प्रत्‍येक घराची वर्गणी = x × 13 = x3
          एकूण जमलेली वर्गणी = एकूण घरे x प्रत्‍येक घराची वर्गनी
          24300 = x × x3 24300 × 3 = x2
          72900 = x2(वर्गमुळ काढा)
          270 = x एकूण घरे


          7) एका वर्गाचा वर्गप्रमुख आपल्‍या वर्गातील 2360 विद्यार्थ्‍याना चौरसाकृती उभे करण्‍याचा प्रयत्‍न करतो परंतु 56 विद्यार्थी उरतात तर प्रत्‍येक रांगेत एकूण विद्यार्थी किती?

            Explanation: 2360 – 56 = 2304
            √2304 = 48 विद्यार्थी प्रत्‍येक रांगेत असतील


            8) गौरव ने वाचनालय खोलण्‍यासाठी काही एकक जमा केली तेव्‍हा त्‍याच्‍याकडे 100 – 100 च्‍या 1600 नोटा जमा झाल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने जेवढे व्‍यक्‍ती आहेत तेवढे रुपये जमा केले तर प्रत्‍येकाने किती रुपये जमा केले?

              Explanation: 1600 – 100 = 160000
              √160000 = 400 रु.


              9) \[\sqrt{3\sqrt{3\sqrt{3\sqrt{3}}}}=?\]

              Explanation: \[x^{(2^{n-1})}\div 2^{n}\: x=\] प्रश्‍नातील संख्‍या 3 – 3 ही संख्‍या 5 वेळा आहे म्‍हणून 2 चा 5 वेळा गुणाकार = 32 व अंशात 32 पेक्षा 1 ने लहान संख्‍या \[\therefore 3\frac{31}{32}\]


              10) \[\sqrt{12+\sqrt{12+\sqrt{12+\sqrt{12.....}}}}=?\]

                Explanation: √(12+ x) = x तर x = 4 (यात 12 च्‍या पुढील वर्गसंख्‍या येण्‍यासाठी 4 मिळवावे लागतात.) उत्‍तर = 4