स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -4 - Maths & Resoning

1) एक वस्‍तु 15000 रुपयांना विकल्यास 25% नफा होतो तर वस्‍तुची खरेदी किंमत किती व त्‍यावर 20% तोटा पाहिजे असल्‍यास ती वस्‍तु कितीला विकावी लागेल?

    Explanation: 100 चा वस्‍तु 125
    x चा वस्‍तु 15000 \[x=\frac{100\times 15000}{125}\]= 12000 रु.


    12000 चा 20% = 12000 x 20 100 = 2400 रु. नफा

    ∴ 12000 - 2400 = 9600 रु. विक्री


    2) एका वस्‍तुची विक्री किंमत 3000 रुपये असल्‍यास त्‍यावर 25% नफा होतो तर ती वस्‍तु किती रुपयांना विकल्‍यास 10% तोटा होईल?

      Explanation: 100 चा वस्‍तु 125
      x चा वस्‍तु 3000 \[x=\frac{100\times 3000}{125}\]= 2400 रु. खरेदी किंमत


      2400 चा 10% = 2400 x 10 100 = 240 रु. तोटा

      ∴ 2400 - 240 = 2160 रु. विक्री


      3) एका दुकानदाराने एक वस्‍तु 15% नफ्याने विकण्‍याऐवजी 35% नफ्याने विकली तर त्‍यास 80 रुपये जास्‍त मिळाले तर त्‍या वस्‍तुची मूळ किंमत किती?

      Explanation: 35% - 15% = 20%
      (नफा – नफा आहे म्‍हणून वजाबाकी)
      20% = 80
      100% = x
      \[x=\frac{100\times 80}{20}\] = 400 रु.


      4) एक वस्‍तु 12% नफ्याने विकण्‍याऐवजी 27% नफ्याने विकल्‍यास 450 रुपये जास्‍त मिळाले असते. तर त्‍या वस्‍तुची मुळ किंमत किती?

      Explanation: 27% - 12% = 15%
      (नफा – नफा आहे म्‍हणून वजाबाकी)
      15% = 450
      100% = x
      \[x=\frac{100\times 450}{15}\]= 3000 रु.


      5) एक वस्‍तु 40% नफ्याने विकण्‍याऐवजी 15% नफ्याने विकल्‍यास 5000 रुपये कमी मिळाले असते तर त्‍या वस्‍तुची मुळ किंमत किती?

        Explanation: 40% - 15% = 25%
        25% = 5000
        100% = x
        \[x=\frac{100\times 5000}{25}\] = 20000 रु.


        6) एक वस्‍तु 20% तोट्याने विकण्‍याऐवजी 12% तोट्याने विकल्‍यास 160 रुपयांच्‍या फरक पडतो. तर त्‍या वस्‍तुची मुळ किंमत किती?

          Explanation: 20% - 12% = 8%
          (तोटा – तोटा आहे म्‍हणून वजाबाकी)
          8% = 160
          100% = x
          \[x=\frac{100\times 160}{8}\] = 2000 रु.


          7) एक वस्‍तु 36% तोट्याने विकण्‍याऐवजी 20% तोट्याने विकल्‍यास 6400 रुपयांच्‍या फरक पडतो तर त्‍या वस्‍तुची मुळ किंमत किती?

            Explanation: 36% - 20% = 16%
            (तोटा – तोटा आहे म्‍हणून वजाबाकी)
            16% = 6400
            100% = x\[x=\frac{100\times 6400}{16}\]= 40000 रु.


            8) एक वस्‍तु 10% तोट्याने विकण्‍याऐवजी 25% तोट्याने विकल्‍यास 600 रुपये कमी मिळतात तर त्‍या वस्‍तुची मुळ किंमत किती?

              Explanation: 25% - 10% = 15%
              (तोटा – तोटा आहे म्‍हणून वजाबाकी)
              15% = 600
              100% = x \[x=\frac{100\times 600}{15}\] = 4000 रु.


              9) एक लाकडी पलंग 6% तोट्याने विकण्‍याऐवजी 4% नफ्याने विकल्‍यास 83 रुपयांचा फरक पडतो तर त्‍या लोकडी पलंगाची मुळ किंमत किती?

              Explanation: 6% + 4% = 10%
              (तोटा – नफा आहे म्‍हणून बेरीज)
              10% = 83
              100% = x\[x=\frac{100\times 83}{15}\]= 830 रु.


              10) एक आलमारी 10% नफ्याने विकण्‍याऐवजी 10% तोट्याने विकली तेव्‍हा 300 रुपये कमी मिळतात तर त्‍या आलमारीची मुळ किंमत किती?

                Explanation: 10% + 10% = 20%
                (नफा – तोटा आहे म्‍हणून बेरीज)
                20% = 300
                100% = x
                \[x=\frac{100\times300}{20}\]= 1500 रु.