1) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तुच्या विक्रीतील फरक 50 रुपये आहे. शेकडा नफ्यातील फरक 10 आहे तर प्रत्येक घडाळाची किंमत किती?
Explanation:
(विक्रीतील फरक) ⁄(नफ्यातील फरक) x 100
\[\frac{50}{10} \times100\] = 500 रुपये
OR
10% = 50
100% = x
\[x=\frac{100\times 50}{10}\] = 500 रुपये
2) समान खरेदी किंमतीच्या दोन खुर्च्यांच्या विक्रीच्या किंमतीत 80 रुपयांच्या फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा 20% आहे तर प्रत्येक खूर्चीची खरेदी किंमत किती?
Explanation:
(विक्रीतील फरक) ⁄(नफ्यातील फरक) x 100
\[\frac{80}{20}\times 100\] = 400 रुपये
OR
20% = 80
100% = x
\[x=\frac{100\times 80}{20}\]= 400 रुपये
3) एका विक्रेत्याने दोन T.V. संच प्रत्येकी 8000रुपयांना विकले. एकाच्या विक्रीतून 20% नफा व दुसर्याच्या विक्रीतून 20% तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा/तोटा सांगा?
Explanation: यात नेहमी तोटा होतो \[\left ( \frac{x}{10} \right )^{2}=x\]x = %\[\left ( \frac{20}{10} \right )^{2}=2^{2}\] = 4% तोटा
4) एका दुकानदाराने दोन घड्याळे प्रत्येकी 990 रुपये प्रमाने विकले. एकात खरेदीच्या 30% नफा व दुसर्यात 30% तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा/तोटा किती?
Explanation: \[\left ( \frac{x}{10} \right )^{2}=\\ =\left ( \frac{20}{10} \right )^{2}=3^{2}\] = 9% तोटा
5) 10 टेबल्सची विक्री किंमत 12 टेबल्सच्या खरेदी इतकी असेल तर शेकडानफा किती?
Explanation:12 – 10 = 2 टेबल्स नफा
(यात लहान किंमत घ्यावे = लहान किंमत 10 आहे)
10 वर 2
100 वर x
\[x=\frac{100\times 2 }{10}\] = 20% नफा
6) 6 टेबल्सची विक्री 9 टेबल्सच्या खरेदी इतकी असेल तर व्यवहारातील शे. नफा व तोटा काढा?
Explanation: 9 – 6 = 3 टेबल्स नफा
6 वर 3
100 वर x
\[x=\frac{100\times 3 }{6}\]= 50% नफा
7) 8 वस्तुंची खरेदी किंमत ही जर 6 वस्तुंच्या विक्री किंमती एवढी असेल तर शे. नफा किती?
Explanation: 8 – 6 = 2 वस्तु नफा
6 वर 2
100 वर x
\[x=\frac{100\times 2 }{6}\]= 33.33% नफा
8) 5 रेडीओची खरेदी किंमत 6 रेडीओच्या विक्री एवढी असल्यास त्या व्यवहारातील शेकडा नफा/तोटा किती?
Explanation: 6 – 5 = 1 रेडीओ तोटा
5 वर 1
100 वर x
\[x=\frac{100\times 1 }{5}\] = 20% नफा