बेरीज व वजाबाकी - Maths & Resoning

 

बेरीज

·         दोन धन संख्‍यांची बेरीज धन संख्‍यांच येते.

·         दोन ॠण संख्‍यांची बेरीज ॠण संख्‍या येते.

उदा. (-3) + (-5) = - 8

·         एक धन व एक ॠण संख्‍यांची बेरीज असल्‍यास मोठ्या संख्‍येतून लहान संख्‍या वजा करून मोठ्या संख्‍येचे चिन्‍ह द्यावे.

जसे = 210 – 180 = 30, 40 – 60 = -20

·         कंसाच्‍या बाहेर ॠण चिन्‍ह असल्‍यास कंसातील प्रत्‍येक पदाचे चिन्‍ह बदलते.

2 – (-8) = 2 + 8 = 10

Short Trick

1) क्रमवार संख्‍यांची बेरीज \[=\frac{n\left ( n+1 \right )}{2}\]

2) क्रमवार विषम संख्‍याची बेरीज = \[n^{2}\]

3) क्रमवार सम संख्‍याची बेरीज = n(n + 1)

4) क्रमवार सम व विषम संख्‍यांच्‍या बेरजेतील फरक दिलेल्‍या संख्‍येच्‍या अर्धे करणे किंवा विषम संख्‍या असल्‍यास पुढील संख्‍येचे अर्धे करणे.

5) क्रमवार संख्‍येच्‍या वर्गाची बेरीज \[\frac{ n\left ( n+1 \right )\left ( 2n+1 \right ) }{6}\]

6) क्रमवार विषम संख्‍यांच्‍या घनांची बेरीज \[\left [ \frac{ n\left ( n+1 \right )}{2} \right ]^{2}\]

वजाबाकी

   वजाबाकी करतांना प्रथम संख्‍या अशा क्रमाने मांडाव्‍यात की एकक च्‍या खाली एकक, दशक च्‍या खाली दशक व नंतर वजाबाकी करावी.