वर्ग, वर्गमुळ , घन व घनमुळ - Maths & Resoning

वर्ग:

    एखाद्या संख्‍येस त्याच संख्‍येने गुणल्‍यास येणारा गुणाकार म्‍हणजे त्‍या संख्‍येचा वर्ग होय.

उदा. 32 = 3 x 3 = 9 म्‍हणजे 3 चा वर्ग 9

1) पूर्णवर्ग संख्‍येच्‍या एकक स्‍थानी 2, 3, 7 किंवा 8 हे अंक नसतात.

2) पूर्णवर्ग संख्‍येच्‍या एकक स्‍थानी नेहमी 0, 1, 4, 5, 6 व 9 हेच अंक असतात.

वर्गमुळ: वर्ग संख्‍या ज्‍या संख्‍येचा वर्ग असतो त्याला वर्गमुळे असे म्‍हणतात.

उदा.  25 ही संख्‍या 5 चा वर्ग आहे. म्‍हणून 5 ला 25 चे वर्गमुळ म्‍हणतात.

·      \[\sqrt{}\]  याला वर्गमुळाचे चिन्‍ह म्‍हणतात.

·         घातांक \[\frac{1}{2}\]  असेल तर त्‍याला वर्गमुळच म्‍हणतात व दिलेल्‍या संख्‍येच्‍या पायाचा वर्गमुळ काढतात.

उदा. \[16^{\frac{1}{2}}\]

 म्‍हणजे 16 चे वर्गमुळ = 4 व या संख्‍येला

·         वर्गमुळात 16 असे वाचतात

वर्ग काढण्‍याची पद्धती:-

   एकक स्‍थानी 5 असल्‍यास

        एकक स्‍थानी 5 असल्‍यास 5 चा वर्ग 25 घ्‍यावे व उर्वरित संख्‍येला त्‍याच्‍या समोरील संख्‍येशी गुणून गुणाकार करावे.

जसे,


1) 352 = यात 5 चा वर्ग 25 व 3 ला समोरील संख्‍येने म्‍हणजे 4 ने गुणावे 3 x 4 = 12  \[\therefore 1225\]


2) 852 = यात 5 चा वर्ग 25 व 8 x 9 = 72    \[\therefore 7225\]

3) 1052 यात 5 चा वर्ग 25 10 11 = 110   \[\therefore 11025\]


4) 1352 यात 5 चा वर्ग 25 व 22 x 23 = 506   \[\therefore 50625\]


5) 2252 यात 5 चा वर्ग 25 13 x 14 = 182 \ 18225


एकक स्‍थानी 5 नसल्‍यास वर्ग काढणे

        एकक स्‍थानी 5 नसल्‍यास वर्ग काढतांना प्रथम पहिल्‍या संख्‍येचे वर्ग करणे नंतर दोन्‍ही संख्‍यांचा गुणाकार करून दुप्‍पट करणे व शेवटी उरलेल्या  संख्‍येचा वर्ग करणे व हातचे मिळवत जाणे.

जसे,

1) 372 = 1369


यात 1) 7 चा वर्ग 49 चे 9 हातचे 4

    2) x 7 x 2 = 42 + हातचे 4 = 46 चे 6 हातचे 4

   3) 3 चा वर्ग 9 + हातचे 4 = 13


2) 642 = 4096 यात

   1) 4 चा वर्ग 16 चे 6 हातचा 1

   2) 6 x 4 x 2 = 48 + हातचा 1 = 49 चे 9 हातचे 4

   3) 6 चा वर्ग 36 + हातचे 4 = 40


3) 1342 = 17956

1) 4 चा वर्ग 16 चे 6 हातचे 1

2) 13 x 4 x 2 = 104 + हातचे 1 = 105 चे 5 हातचे 10

3) 13 चा वर्ग 169 + हातचे 10 = 179


4) 1262 = 15876

1) 6 चा वर्ग 36 चे 6 हातचे 3

2) 12 x 6 x 2 = 144 + हातचे 3 = 147 चे 7 हातचे 14

3) 12 चा वर्ग 144 + हातचे 14 = 158

एकक स्‍थानी 0 असल्‍यास वर्ग काढणे

    एकक स्‍थानी 0 असल्‍यास शेवटी दुप्‍पट शुन्‍य द्यावे व उर्वरीत संख्‍येचे वर्ग काढावे.

उदा.

1) 402 = यात 4 चा वर्ग 16 व शेवटी एक शुन्‍य आहे म्‍हणून दोन शुन्‍य द्यावे. = 402 = 1600


2) 1402 = 14 चा वर्ग 196 व शेवटी दोन शुन्‍य 19600


3) 16002 = 16 चा वर्ग 256 व शेवटी 4 शुन्‍य 2560000


एकक स्‍थानी 5 असल्‍यास वर्गमुळ काढणे

    एकक स्‍थानी 5 असल्‍यास शेवटी 5 घ्‍यावे व दुसरी संख्‍या सोडून उर्वरीत संख्‍येच्‍या खालील वर्गसंख्‍या घेऊन वर्गमुळ काढावे.

उदा. \[1)\: \: \sqrt{3025}=55\]

 एकक 5 आहे म्‍हणून 5 व 2 सोडून उर्वरीत 30 पेक्षा लहान वर्गसंख्‍या 25 वे वर्गमुळ 5

\[2)\: \: \sqrt{9025}=95\]

 एकक 5 आहे म्‍हणून 5 व 2 सोडून उर्वरीत 90 पेक्षा लहान वर्गसंख्‍या 81 चे वर्गमुळ 9

* वर्गमुळात एकक 5 असल्‍यास दशक नेहमी 2 असते.

* वर्गमुळात एकक 0 असेल तर दशक नेहमी 0 असते.

\[3)\: \: \sqrt{13225}=115\]

 एकक स्‍थानी 5 आहे म्‍हणून 5 व 2 सोडून उर्वरीत 132 पेक्षा लहान वर्गसंख्‍या 121 चे वर्गमुळ 11

एकक स्‍थानी 0 असल्‍यास वर्गमुळ काढणे

एकक स्‍थानी 0 असल्‍यास 0 घ्‍यावे व दुसरीसंख्‍या सोडून उर्वरित संख्‍यांचे वर्गमुळ घ्‍यावे.

जसे \[1)\: \: \sqrt{2500}=50\]

 एकक 0 आहे म्‍हणून 0 घ्‍यावे व दुसरी संख्‍या 0 सोडून उर्वरित 25 चे वर्गमुळ 5 घ्‍यावे.

\[2)\: \: \sqrt{16900}=130\]

 एकक 0 आहे म्‍हणून 0 घ्‍यावे व दुसरी संख्‍या 0 सोडून उर्वरीत संख्‍या 169 चे वर्गमुळ 13 घ्‍यावे.

एक स्‍थानी 0 किंवा 5 नसल्‍यास वर्गमुळ काढणे

एकक स्‍थानी 1 असल्‍यास 1 व 9 घ्‍यावे 4 असल्‍यास 2 व 8 घ्‍यावे, 9 असल्‍यास 3 व 7 घ्‍यावे व 6 असल्‍यास 4 व 6 घ्‍यावे व दुसरी संख्‍या सोडून उर्वरीत संख्‍येच्‍या खालील वर्गसंख्‍या घेऊन वर्गमुळ काढणे व दिलेली संख्‍या वरील वर्गसंख्‍येच्‍या जवळ किंवा खालील वर्गसंख्‍येच्‍या जवळ आहे ते पाहून लहान किंवा मोठी संख्‍या ठरविले.



   5 = 5

   0 = 0

उदा.\[\: \: \sqrt{3136}\]

    यात एकक 6 आहे म्‍हणून 4 व 6 घेणे नंतर 3 सोडून 31 पेक्षा लहान वर्गसंख्‍या 25 चे वर्गमुळ 5 दोन्‍ही संख्‍ये समोर ठेवणे व आता 31 पेक्षा लहान वर्गसंख्‍या 25 व मोठी वर्गसंख्‍या 36 घ्‍यावे व 31 कोणत्‍या संख्‍येच्‍या जवळ आहे ते ठरवावे. 25 च्‍या जवळ असल्‍यास 54 (लहान संख्‍या) व 36 च्‍या जवळ असल्‍यास 56 (मोठी संख्‍या) घ्‍यावे.


एकक 9 आहे म्‍हणून 3 किंवा 7 घेणे नंतर

   106 पेक्षा लहान वर्गसंख्‍या 100 चे वर्गमुळ 10. 106 ही संख्‍या 100 च्‍या जवळ आहे म्‍हणून 103

घन काढणे

    कोणत्‍याही संख्‍येचा तिन वेळाकेलेला गुणाकार म्‍हणजे घन होय. a3 = 7 x 7 x 7

उदा.  


   73 = 7 x 7 x 7 = 343


   153 = 15 x 15 x 15 = 3375


   222 = 22 x 22 x 22 = 10648


   93 = 9 x 9 x 9 = 729

घनमुळ काढणे

    घनमुळ काढतांना एकक स्‍थानी 2 असेल तर 8 व 8 असेल तर 2 घ्‍यावे तसेच 3 असेल तर 7 व 7 असेल तर 3 घ्‍यावे. उर्वरीत तेच अंक घ्‍यावे नंतर 2 अंक सोडून उर्वरीत संख्‍येपेक्षा खालील घनसंख्‍या घेऊन घनमुळ काढणे.

उदा.

\[1)\: \: \sqrt[3]{15625}=25\]

 यात एकक 5 आहे म्‍हणून 5 घ्‍यावे व नंतर 62 सोडून उर्वरीत 15 पेक्षा लहान घनसंख्‍या 8 चे घनमुळ 2 घ्‍यावे.

\[2)\: \: \sqrt[3]{592704}=84\]

 यात एकक 4 आहे म्‍हणून 4 घेणे व नंतर 70 सोडून उर्वरीत 592 पेक्षा लहान घनसंख्‍या 512 चे घनमुळ 8 घेणे.

3) \[3)\: \: \sqrt[3]{185193}=57\]

 यात एकक 3 आहे म्‍हणून 7 घेणे व 19 सोडून उर्वरीत संख्‍या 185 पेक्षा लहान घनसंख्‍या 125 चे घनमुळ 5 ठेवणे.

Short Trick

वर्ग काढणे.


1) 472 = ?  Step 1) 72 = 49 चे 9 हातचे 4


   2209      Step 2)  2 x 4 x 7 = 56 हातचे 4 = 60 चे 0 हातचे 6


                 Step 3)  42 = 16 + हातचे 6 = 22


2) 652 = ?  Step 1) 52 = 25


   4225     Step  2) 6 x 7 = 42


3) 1252 = ?  Step 1) 52 = 25


   15625   Step 2) 12 x 13 = 156