विभाजन कसोट्या - Maths & Resoning

  विभाजन कसोट्या 

2 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येच्‍या एकक स्‍थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतात किंवा जी समसंख्‍या असते तिला 2ने निशेष भाग जाते.

उदा. 4628, 13576, 246358

3 ची कसोटी:-

दिलेल्‍या संख्‍येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्‍या संख्‍येला 3 ने नि:शेष भाग जातो.

उदा. 1) 23541 (2 + 3 + 5 + 4 + 1) = 15

   2) 65325 (6 + 5 + 3 + 2 + 5) = 21

4 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येच्‍या शेवटच्‍या 2 अंकाला 4 ने भाग जाते किंवा शेवटी दोन शुन्‍य असल्‍यास त्‍या संख्‍येला 4 ने निशेष भाग जाते.

उदा. 2984, 67320, 13200

5 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येच्‍या एकक स्‍थानी शुन्‍य (0) किंवा असल्‍यास त्‍या संख्‍येला 5 ने निशेष भाग जातो.

उदा. 1425, 6930, 42350

6 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येला 2 व 3 ने निशेष भाग जातो त्‍या संख्‍येला 6 ने निशेष भाग जातो.

उदा. 53346, 23682

7 ची कसोटी:-

एकक अंक सोडून उरलेल्‍या संख्‍येतून एकक अंकाची दुप्‍पट वजा करून येणार्‍या वजाबाकीला 7 ने भाग जात असल्‍यास त्‍या संख्‍येला 7 ने निशेष भाग जातो.

उदा. 1) 882

   (88 – 2 ´ 2) = 84 ला 7 ने भाग जातो म्‍हणून 882 ला 7 ने भाग जातो.

   2) 8638

   (863 – 8 ´ 2) = 847 ला 7 ने भाग जातो म्‍हणून 8638 ला 7 ने निशेष भाग जातो.

8 ची कसोटी:-

शेवटच्‍या तिन अंकाला 8 ने भाग गेल्‍यास किंवा शेवटी तीन शुन्‍य असल्‍यास त्‍या संख्‍येला 8 ने निशेष भाग जातो.

उदा. 12256, 81480, 389000

9 ची कसोटी:-

संख्‍येतील अंकाची बेरीज 9 च्‍या पाठ्यात असल्‍यास त्‍या संख्‍येला 9 ने निशेष भाग जातो.

उदा.   1) 87327 (8 + 7 + 3 + 2 + 7 = 27)

      2) 23580 (2 + 3 + 5 + 8 + 0 = 18)

      3) 8972433 (8 + 9 + 7 + 2 + 4 + 3 + 3 = 36)

10 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येच्‍या एकक स्‍थानी 0 असेल तर त्‍या संख्‍येला 10 ने निशेष भाग जाते.

उदा. 3450, 4560, 68480

11 ची कसोटी:-

एक आड एक संख्‍येची बेरीज करून वजाबाकी केल्‍यास ती 0 किंवा 11 च्‍या पाढ्यात असल्‍यास त्‍या पुर्ण संख्‍येला 11 ने निशेष भाग जातो.

उदा. 52382 (5 + 3 + 2 – 2 + 8 = 10 – 10 = 0)

   399883 (3 + 9 + 8) – (9 + 8 + 3) = 20 – 20 = 0)

   290807 – (2 + 0 + 0) – (9 + 8 + 7) = 2 – 24 = 22)

12 ची कसोटी:-

    ज्‍या संख्‍येला 3 व 4 ने भाग जातो.

उदा. 34536, 63156

15 ची कसोटी:-

    ज्‍या संख्‍येला 3 व 5 ने भाग जातो.

उदा. 7845, 86535, 91215

20 ची कसोटी:-

    ज्‍या संख्‍येला 4 व 5 ने भाग जातो.

उदा. 34960, 194580

24 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येला 8 व 3 ने भाग जातो. त्‍या संख्‍येला 24 ने निशेष भाग जातो.

उदा. 946512

25 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येच्‍या शेवटचे दोन अंक 25 ने भाग जाणारे असतील किंवा दोन शुन्‍य असतील तर त्‍या संख्‍येला 25 ने निशेष भाग जातो.

उदा. 19425, 67500, 369475, 5650

36 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येला 4 व 9 ने भाग जातो. त्‍या संख्‍येला 36 ने निशेष भाग जातो.

उदा. 49356, 43092

55 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येला 11 व 5 ने भाग जातो त्‍या संख्‍येला 55 ने निशेष भाग जातो.

उदा. 673695

72 ची कसोटी:-

ज्‍या संख्‍येला 8 व 9 ने भाग जातो त्‍या संख्‍येला 72 ने निशेष भाग जातो.

उदा. 14256, 9720, 88848, 105696