लसावी (LCM)
= लघुत्तम सामाईक विभाज्य
Linear Common Multipyer
(लघुत्तम
समापवर्तक)
मसावी (HCF)
= महत्तम सामाईक विभाजक
Higher Common Factor
(महत्तम
समापवर्तक)
सामाईक विभाजक/अवयव:-
जेव्हा वेगवेगळ्या
संख्यांना एकाच संख्येनी पूर्ण भाग जातो. तेव्हा त्यांना सामाईक अवयव म्हणतात.
उदा.
8, 16, 24 ला 8 ने भाग जातो तर 8 सामाईक अवयव आहे.
महत्तम विभाजक:-
संख्येच्या मोठ्या विभाजकाला महत्तम विभाजक
असे म्हणतात.
उदा. 36 चे विभाजक = 2,
3, 4, 6, 9, 12 व 18 म्हणून 18 ला महत्तम विभाजक म्हणतात.
40 चे विभाजक = 2,
4, 5, 8, 10 व 20 म्हणून 20 ला महत्तम विभाजक म्हणतात.
विभाजक: ज्या
संख्येने भाग जातो त्याला विभाजक म्हणतात.
उदा.
1) 15 ला 3 व 5 ने भाग जातो म्हणून 15 चे विभाजक 3 व 5
2) 24 ला 2,
3, 4, 6, 8 व 12 ने भाग जातो म्हणून त्यांना 24 चे
विभाजक म्हणतात.
भाज्य:- ज्या संख्येला
भागतो त्या संख्येला भाज्य म्हणतात.
उदा.
6 व 8 ने जाणारी संख्या 24, 48, 96, 72,.........आहेत त्यांना भाज्य म्हणतात.
·
विभाजक
मर्यादित असतात.
·
भाज्य
अमर्याद असतात.
1)
एक संख्या एकापेक्षा जास्त संख्यांची विभाजक असू
शकते.
2) एका संख्येला
एकापेक्षा जास्त विभाजक असू शकतात.
सामाईक विभाज्य:- 2 व
3 ने 6 ला भाग जातो म्हणून 6 हा सामाईक विभाज्य आहे.
उदा.
2 व 3 चे सामाईक विभाज्य = 6, 12, 18, 24,
(परंतु लसावीत लहान घ्यावे लागते म्हणून 6
होईल.)
लघुत्तम सामाईक विभाज्य:- लघुत्तम
सामाईक विभाज्य म्हणजे लहानात लहान सामाईक विभाज्य जसे 12 व 6 चे विभाज्य = 12, 24, 36,....
(परंतु यात 12 उत्तर येईल)
मसावी:-
महत्तम सामाईक विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्यांना
मोठ्यात - मोठ्या संख्येने भागने होय. ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने निषेश भाग
जातो त्या संख्येला मसावी म्हणतात.
उदा. 4,
12, 18 चा संख्याना समान 2 ने भाग जातो. म्हणून मसावी
2 होईल.
लसावी:-
लघुत्तम सामाईक
विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनि भाग जाईल.
उदा. 5, 10 व 15 ने भाग जाणार्या संख्या 30,
60, 90......
(परंतु यात 30 उत्तर होईल)