1) एका खोलीचे भाडे शेकडा 20 ने वाढविले पुन्हा काही महिण्यानंतर शेकडा 25 ने वाढविले तर मुळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली ?
Explanation: समजा मुळ भाडे 100 समजू
प्रथम 20% वाढ म्हणजे 120 व नंतर 120 चे 25% वाढ
100 ➖ 20% वाढ➡ 120 ➖25% वाढ➡ 120 + 30 = 150
किंवा = प्रथम 20% वाढ म्हणजे 20 व नंतर 120 चे 25% म्हणजे 30
∴ 20 + 30 = 50% वाढ
2) एका वस्तुची किंमत प्रथम 30 टक्के ने कमी केली व नंतर 40% ने वाढविली तर मुळ किंमतीत शेकडा कितीने फरक पडेल?
Explanation: मुळ किंमत 100
100 चे 30% कमी = 70 उरले व आता
70 चे 40% वाढ = 70 + 28 = 98
∴ 100 – 98 = 2% घट होईल.
3) एका MSEB कंपनीने विद्युत बिल प्रथम 20% ने कमी केले व नंतर 30% ने वाढविले. तर मुळ बिलात शेकडा कितीने वाढ किंवा घट होईल?
Explanation: मुळ बिल 100 समजु
100 चे 20% कमी = 80 उरले व आता
80 चे 30% वाढ = 80 + 24 = 104
∴ 104 – 100 = 4% वाढ होईल
4) एका वस्तुंची किंमत प्रथम 20% ने वाढविली व नंतर 20% ने कमी केली तर मुळ किंमतीत शेकडा कितीने बदल होईल?
Explanation: \[\frac{x^{2}}{100}x=\cdot/\cdot\frac{20^{2}}{100}=\frac{400}{100}=4\cdot/\cdot\]= 4% घट
नोट :- यात नेहमी घट होते हे लक्षात घ्यावे.
OR
\[\left ( \frac{x^{2}}{100} \right )x=\cdot/\cdot \\ \left ( \frac{20}{100} \right )^{2}=2^{2}\] 4% घट होईल
5) एका कंपनीतील कामगारांचा पगार प्रथम 30% ने कमी केला व नंतर 30% ने वाढविला तर मुळ पगारात शेकडा कितीने वाढ किंवा घट होईल?
Explanation:\[\left ( \frac{x^{}}{10} \right )^{2} \left ( \frac{30}{10} \right )^{2}=3^{2}\] = 9% पगारात घट
6) एका वस्तुची किंमत 10% ने वाढल्यामुळे खप 10% ने कमी झाली तर एकूण व्यवहारावर काय परिणाम पडेल.
Explanation: \[\left ( \frac{x^{}}{10} \right )^{2} \left ( \frac{10}{10} \right )^{2}=1^{2}\]=1% घट/तोटा होईल
7) एका वस्तुची किंमत 12% ने वाढली म्हणून खप 12% नी कमी झाला तर मुळ व्यवहारात काय फरक पडेल?
Explanation: \[\left ( \frac{x^{}}{10} \right )^{2} \left ( \frac{12}{10} \right )^{2}=1.2^{2}\] = 1.44% घट/तोटा