स्पष्टीकरणासह प्रश्‍न Type - 11 - Maths & Resoning

1) एका पुस्‍तकाची किंमत शेकडा 20% ने कमी केल्‍यास त्‍याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्‍या उत्‍पन्‍नात शेकडा कितीने फरक पडेल?

    Explanation: समजा 100 प्रतीची किंमत 100 रु.
    100 ची किंमत 80 झाली तर खप 100 चा 125 झाला.
    ∴ 100 – 80
    125 – x } तीरपा गुणाकार
    X x 100 = 80 x 125 \[x=\frac{80\times 125}{100}=100\] ∴ 100 चा उत्‍पन्‍न 100 च आहे
    ∴ काहीही फरक पडणार नाही
    OR
    समजा 100 मुळ किंमत
    100 ➖20% कमी ➡80 ➖25% वाढ➡ 80 + 20 = 100 ∴ 100 – 100 = 0 काहीही फरक पडणार नाही


    2) वस्‍तुच्‍या किंमतीत 30% कपात केली त्‍यामुळे वस्‍तुंचा खप 20% नी वाढला तर व्‍यवहारावर काय परिणाम होईल.

      Explanation:समजा 100 मुळ किंमत
      100 ➖ 30% कमी➡ 70 ➖20% वाढ➡ 70 + 14 = 84
      ∴ 100 – 84 = 16% घट/तोटा


      3) वस्‍तुंच्‍या किंमती 20% वाढल्‍यामुळे खप 30% कमी झाला. तर मुळ किंमतीत शेकडा कितीने फरक पडेल?

      Explanation: समजा 100 मुळ किंमत
      100 ➖ 20% वाढ ➡ 120 ➖ 30% कमी ➡ 120 - 36 = 84
      ∴ 16% घट/तोटा होईल.


      4) एक संख्‍या 15% ने वाढविल्‍यास 92 होते तर ती संख्‍या कोणती? (STI/ASST 1996)

      Explanation: 100 – 115
      x – 92 } तीरपा गुणाकार
      वाढले असेल तर +
      कमी असेल तर -
      X x 115 = 100 x 92\[x=\frac{100\times 90}{115}=80\]


      5) एक संख्‍या 25% ने कमी केल्यास ती 14400 होते तर ती संख्‍या कोणती?

        Explanation: 100 – 75
        x – 14400 } तीरपा गुणाकार
        X x 75 = 100 x 14400 \[x=\frac{100\times 14400}{75}=19200\]


        6) एक संख्‍या 30% ने वाढविल्‍यास 6500 होते तर ती संख्‍या कोणती?

          Explanation: 100 – 130
          x – 6500 } तीरपा गुणाकार
          X x 130 = 100 x 6500 \[x=\frac{100\times 6500}{130}=5000\]


          7) एक संख्‍या 40% ने कमी केली तर 8400 होते तर ती संख्‍या कोणती?

            Explanation: 100 – 60
            x – 8400 } तीरपा गुणाकार
            X x 60 = 100 x 8400 \[x=\frac{100\times 8400}{60}=14000\]


            8) एका शाळेत गतवर्षी 480 मुले होते. चालुवर्षी 540 मुले आहेत तर शेकडा वाढ किती? (लिपीक टंकलेखक पुणे - 2009)

              Explanation: 540 – 480 = 60 मुले वाढले
              480 – 60
              100 – x } तीरपा गुणाकार \[x=\frac{100\times 60}{480}\]x=12.5 % मुले वाढली