वर्गमुळ:
1) दशांश नाही असे गृहीत धरून वर्गमुळ काढणे
2) दशांशानंतर जेवढे अंक असतील त्याच्या अर्धे करून उत्तरात दशांशानंतर अंक ठेवणे.
3) दशांशानंतर 1, 3, 5, 7 असे विषम अंक राहत नाही व असेल तर त्यांचे वर्गमुळ निश्चीत निघत नाही.
1) \[\sqrt{1.69}=?\]
Explanation: 169 चे वर्गमुळ = 13 = 1.3
(दशांशानंतर दोन अंक आहेत म्हणून उत्तरात 1 अंक येईल)
2) \[\sqrt{0.000729}=?\]
Explanation: 729 चे वर्गमुळ = 27
व दशांश 3 अंकानंतर येईल 0.027
3) \[\sqrt{0.4096}=?\]
Explanation: 4096 चे वर्गमुळ = 64 = 0.64
4) \[\sqrt{102.01}=?\]
Explanation:10201 चे वर्गमुळ 101 आहे. दशांशानंतर दोन अंक आहेत म्हणून उत्तरात 1 अंक येईल