1) एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला. दुसर्याला 25% गुण मिळाले व तो 50 गुणांनी नापास झाला तर ती परिक्षा किती गुणांची होती
Explanation: टक्केवारीतील फरक 30% – 25% = 5%
मार्कमधील फरक 50 – 20 = 30
(दोन्ही नापास म्हणून वजाबाकी)
5% = 30
100% = x } तीरपा गुणाकार \[x=\frac{100\times 30}{5}=600\]
2) एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले व तो 25 गुणांनी नापास झाला. दुसर्याला 32% गुण मिळाले व तो 65 गुणांनी नापास झाला तर ती परिक्षा किती गुणांची होती.
Explanation: 40% – 32% = 8%
65 – 25 = 40
(दोन्ही नापास म्हणून वजाबाकी)
8% = 40
100% = x }\[x=\frac{100\times 40}{8}=500\]
3) एका विद्यार्थ्याला 34% गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला. दुसर्याला 39% गुण मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणार्या गुणांपेक्षा 30 गुण जास्त मिळाले तर ती परिक्षा किती गुणांची होती?
Explanation: 39% – 34% = 5%
20 + 30 = 50
(एक नापास एक पास म्हणून बेरीज)
5% = 50
100% = x \[x=\frac{50\times 100}{2}=1000\]
4) 20 लीटर द्रावणात 15 टक्के अल्कोहोल व उर्वरीत पाणी आहे. जर द्रावणात 3 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण किती?
Explanation: \[20\times \frac{15}{100}=3\] लीटर अल्कोहोल
द्रावणात 3 लीटर पाणी टाकले = 20 + 3 = 23 ली.
अल्कोहोलचे प्रमाण =\[=\frac{3}{23}\times 100\]= 13.04% \[Trick :- 15 \times \frac{20}{20+3}=13.04\] अल्कोहोल
5) 45 लीटर द्रावणात 20% अल्कोहोल व उर्वरीत पाणी आहे. जर द्रावणात 5 लीटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे प्रमाण काढा.
Explanation: \[20\times \frac{45}{45+5}\]=18% अल्कोहोल
6) 12 लीटर द्रावणात 25% पाणी व उर्वरीत अल्कोहोल आहे. जर द्रावणात 4 लीटर अल्कोहोल टाकले तर पाण्याचे प्रमाण काढा.
Explanation: \[25\times \frac{12}{12+4}\]= 18.75% पाणी