स्पष्टीकरणासह प्रश्‍न -Type - 14 - Maths & Resoning

घनमुळ:

1) दशांश नाही असे समजून घनमुळ काढावे
2) प्रश्‍नांत दशांशानंतर जेवढे अंक आहेत. त्‍यास 3 ने भागून येणार्‍या उत्‍तराएवढे अंक सोडून डावीकडे दशांश द्या. 3 अंकासाठी 1 अंक, 6 साठी 2, 9 साठी 3)

1) \[\sqrt[3]{0.000729}=?\]

    Explanation: 729 चे घनमुळ = 9
    =0.09
    (दशांशानंतर 6 अंकासाठी 2 अंक द्यावे)


    2) 0.000004096 चे घनमुळ किती?

      Explanation: यात 4096 चे घनमुळ 16 आहे
      ∴ 0.016


      3)\[\sqrt[3]{0.343}=?\]

      Explanation: 343 चे घनमुळ 7
      ∴ 0.7


      4) \[\sqrt[3]{15.625}=?\]

      Explanation: 15625 चे घनमुळ 25
      ∴ 2.5


      5) \[\sqrt[3]{0.050653}=?\]

        Explanation: 50653 चे घनमुळ 37
        ∴ 0.37


        Type - 15

        6) एका संख्‍येला 0.72 ने गुणण्‍याऐवजी 7.2 ने गुणलेतर मुळ उत्‍तर 2592 ने जास्‍त आले तर ती संख्‍या कोणती?

          Explanation: समजा ती संख्‍या x
          7.2x – 0.72x = 2592
          720x – 72x = 259200
          648x = 259200
          \[x=\frac{259200}{648}=400\]