स्पष्टीकरणासह प्रश्‍न Type - 14 - Maths & Resoning

1) एका गावची लोकसंख्‍या 1,00,000 आहे ती अनुक्रमे तीन वर्ष 10%, 11%, व 12% ने वाढते तर तीन वर्षानंतर त्‍या गावची लोकसंख्‍या किती?

    Explanation: वाढते म्‍हणून 100 मध्‍ये तेवढे जोडावे \[100000\times \frac{110}{100}\times \frac{111}{100}\times \frac{112}{100}\] = 136752 एकूण लोकसंख्‍या


    2) एका व्‍यक्‍तीकडे 50,000 रुपये होते. पहिल्‍या वर्षी 10% वाढले दुसर्‍या वर्षी 15% वाढले व ‍तिसर्‍या वर्षी 20% वाढलेतर तीन वर्षानंतर एकूण किती रुपये असतील?

      Explanation:\[50000\times \frac{110}{100}\times \frac{115}{100}\times \frac{120}{100}\] = 75900 एकूण लोकसंख्‍या


      3)एका गावची लोकसंख्‍या 100000 आहे ती तीन वर्ष अनुक्रमे 10%, 15% व 20% ने कमी होते तर 3 वर्षानंतर एकूण एकूण लोकसंख्‍या किती?

      Explanation: कमी होते म्‍हणून 100 मधून वजा करावे.\[100000\times \frac{90}{100}\times \frac{85}{100}\times \frac{80}{100}=61200\]


      4) एका गावची लोकसंख्‍या 10000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर 3 वर्षानंतर एकूण लोकसंख्‍या किती?

      Explanation:\[P\left ( 1+\frac{r}{100} \right )^{T}\\ 1000\left ( 1+\frac{10}{100} \right )^{3}\\ 10000\left ( \frac{110}{100} \right )^{3}\\ 10000\times \frac{110}{100}\times \frac{110}{100}\times \frac{110}{100}=10\times 1331\] = 13310 एकूण लोकसंख्‍या


      5) एका विद्यार्थ्‍याला पास होण्‍यासाठी 35% गुणांची गरज असतांना त्‍याला 200 गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला तर ती परिक्षा किती गुणांची असेल? (पोलीस भरती 2017)

        Explanation:35% = 200 + 10 = 210
        35% = 210
        100% = x }\[x=\frac{100\times 210}{35}=600\]


        6) एका विद्यार्थ्‍याला परिक्षेत पास होण्‍यासाठी 40% गुणांची गरज असतांना त्‍याला 300 गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला तर ती परिक्षा किती गुणांची असेल?

          Explanation: 40% = 300 + 20 = 320
          40% = 320
          100% = x }\[x=\frac{100\times 320}{40}=800\]


          7) रामला परिक्षेत पास होण्‍यासाठी 38% गुणांची गरज असतांना त्‍याला 400 गुण मिळाले तेव्‍हा त्‍याला पास होण्‍याच्‍या अटीपेक्षा 20 गुण जास्‍त झाले तर ती परिक्षा किती गुणांची असेल.

            Explanation: 38% = 400 - 20 = 380
            38% = 380
            100% = x }\[x=\frac{100\times 380}{38}=1000\]