स्पष्टीकरणासह प्रश्‍न Type - 15 - Maths & Resoning

1) एक व्‍यक्‍ती स्‍वत:च्‍या पगाराच्‍या 30% जेवणावर 15% कपड्यावर व 25% मनोरंजनावर खर्च करतो तरी सुद्धा त्‍याच्‍याकडे 6000 रु. उरतात तर एकूण पगार किती?

    Explanation: 30% + 15% + 25% = 70% खर्च करतो म्‍हणून 30% उरतात.
    30% = 6000
    100% = x } \[x=\frac{100\times 6000}{30}=20000\]


    2) एक व्‍यक्‍ती आपल्‍या पगाराच्‍या 5% जेवनावर, 25% कपडे, 30% पेट्रोल व 15% घरभाड्यावर खर्च करतो तरी त्‍याच्‍याकडे 10000 रु. उरतात तर त्‍याचा पगार किती?

      Explanation: 5%+25%+30%+15% = 75 खर्च करतो म्‍हणून 25% उरतात
      25% = 10000
      100% = x } \[x=\frac{100\times 10000}{25}=40000\]


      3) राम आपल्‍या पगाराच्‍या 1 8 पगार मुलगा,


      1⁄16 मुलगी व 1 2 पगार पत्‍नीला देतो तरी

      त्‍याच्‍याकडे 7500 रु उरतात. तर त्‍याचा एकूण पगार किती?

      Explanation: \[\frac{1}{8}+\frac{1}{16}+\frac{1}{2}=\frac{11}{16}\] खर्च करतो
      तो 16 पैकी 11 भाग खर्च करतो म्‍हणून 5 भाग उरतात.
      5 = 7500
      16 = x }\[x=\frac{16\times 7500}{5}=24000\]


      4) एक व्‍यक्‍ती आपल्‍या पगाराच्‍या 40% जेवनावर, 30% कपडे व 20% मनोरंजनावर खर्च करतो तरी त्‍याच्‍याकडे 1200 रु. उरतात तर अनुक्रमे जेवणावर व कपड्यावर किती खर्च करतो?

      Explanation: 40% + 30% + 20% खर्च करतो
      = 90% खर्च 10% बचत
      1. एकूण पगार 10% = 1200
      100% = x } \[x=\frac{100\times 1200}{10}=12000\] 2. जेवणावर खर्च 10% = 1200
      40% = x } \[x=\frac{40\times 1200}{10}=4800\] 3. कपड्यावर खर्च 10% = 1200
      30% = x } \[x=\frac{30\times 1200}{10}=3600\] 4. मनोरंजन खर्च 10% = 1200
      20% = x } \[x=\frac{20\times 1200}{10}=2400\]


      5)बाजुचा आकृतीत ज्‍वारीवरील खर्च 1300 रुपये असल्‍यास इतर धान्‍यांचे खर्च काढा.

        Explanation: ज्‍वारी 20% = 1300रु. खर्च 1. गहू 10% 20% = 1300
        100% = x } \[x=\frac{100\times 1300}{10}=650\] 2. चना 30% 20% = 1300
        30% = x } \[x=\frac{30\times 1300}{20}=1950\] 3. मका 25% 20% = 1300
        25% = x } \[x=\frac{25\times 1300}{20}=1625\] 4. बाजरी 15% 20% = 1300
        15% = x } \[x=\frac{15\times 1300}{20}=975\]


        6) एक व्‍यक्‍ती स्‍वत:च्‍या पगाराच्‍या 20% जेवनावर उर्वरित पगाराच्‍या 50% रक्‍कम कपड्यावर खर्च करतो. तरी सुद्धा त्‍याच्‍याकडे 4000 रुपये शिल्‍लक उरतात तर त्‍याचा एकूण पगार किती?

          Explanation: 20% जेवनावर खर्च करतो = 80% उरतात.
          आता 80 चे 50% = 40% कपड्यांवर खर्च = 20% + 40% = 60%, एकूण खर्च,
          100 – 60 = 40% शेवटी उरतात
          40% = 4000
          100% = x } \[x=\frac{100\times 4000}{40}=10000\] x= 10000 पगार


          7) एक व्‍यक्‍ती आपल्‍या पगाराच्‍या 25% जेवनावर उर्वरित पगाराच्‍या 30% रक्‍कम कपड्यावर खर्च करतो. तरी सुद्धा त्‍याच्‍याकडे 5250 रुपये शिल्‍लक उरतात तर त्‍याचा एकूण पगार किती?

            Explanation: 25% जेवनावर खर्च करतो = 75% उरतात.


            आता 75 चे 30% = 75 x 30 100 = 22.5% कपड्यांवर
            = 25% + 22.5% = 47.5% एकूण खर्च = 100 – 47.5 = 52.5% शेवटी उरतात
            52.5% = 5250
            100% = x } \[x=\frac{100\times 5250}{52.5}=10000\]x= 10000 पगार


            8) 30 लीटर मिश्रणात 40% अल्‍कोहोल आहे. तर मिश्रणात किती लीटर पाणी टाकले असता अल्‍कोहोलचे प्रमाण 25% होईल?

              Explanation: A = 40%, B = 25%, C = 30 lit
              सुत्र = \[\frac{C\left (A-B \right )}{B}= \frac{30\left (40-25 \right )}{25}\] = 18 लीटर


              9) 50 लीटर मिश्रणात 30% अल्‍कोहोल आहे तर मिश्रणात किती लीटर पाणी टाकले असता अल्‍कोहोलचे प्रमाण 10% होईल.

              Explanation: A = 30%, B = 10%, C = 50 lit
              सुत्र = \[\frac{C\left (A-B \right )}{B}= \frac{50\left (30-10 \right )}{10}\] = 100 लीटर


              10) एका गावची लोकसंख्‍या 4500 आहे. त्‍यापैकी 1118 पुरुष आहेत व बाकी महिला 40% पुरुष विवाहित आहेत. तर विवाहित महिलांची टक्‍केवारी किती?

                Explanation: पुरुष = 4500 x 11 18 = 2750


                विवाहित पुरुष = 2750 x 40 100 = 1100

                महिलांची संख्‍या = 4500 – 2750 = 1750

                विवाहित पुरुष 1100 ∴ विवाहित महिला 1100

                विवाहित महिलांची टक्‍केवारी = 1100 1750 x 100 = 62 6 7 %