स्पष्टीकरणासह प्रश्‍न -Type - 4 - Maths & Resoning
भागाकार करतांना प्रथम दशांश नाही असे समजून भागाकार करावे व नंतर खालील गोष्‍टी लक्षात घ्‍याव्‍या.

लक्षात ठेवा:-

1) अंशात व छेदात दशांश समान अंकानंतर असेल तर रद्द होतो.
2) जर अंशात छेदापेक्षा दशांशानंतर जेवढ्या संख्‍या जास्‍त आहेत तेवढ्याच संख्‍येने उत्‍तरात दशांश द्यावा.
3) जर छेदात अंशापेक्षा दशांशानंतर जेवढ्या संख्‍या जास्‍त आहेत. तेवढ्याच संख्‍येने दशांश उजविकडे सरकविणे किंवा तेवढे शुन्‍य देणे.
4) कोणत्‍याही संख्‍येच्या छेदात जेवढे शुन्‍य आहेत तेवढ्याच संख्‍येनंतर अंशात दशांश येतो. किंवा दशांश डावीकडे सरकणे\[1)\:\:\frac{23}{10}=2.3\].(1 शुन्‍य म्‍हणून 1 संख्‍येनंतर दशांश) \[2) \: \: \frac{512}{100}=5.12\](2 शुन्‍य म्‍हणून 2 संख्‍येनंतर दशांश)
5) कोणत्‍याही दशांश असलेल्‍या संख्‍येला 1 वर जेवढे शुन्‍य देऊन गुणाकार केले तेवढ्याच संख्‍येनंतर दशांश उजवीकडे सरकतो.
उदा. 1) 3.124 x 100 = 312.4 (2 शुन्‍य म्‍हणून 2 संख्‍यांनंतर दशांश उजविकडे)
2) 311.2468 x 1000 = 311246.8 (3 शुन्‍य म्‍हणून 3 अंकांनंतर दशांश उजविकडे)

1) \[\: \frac{0.15}{0.05}=?\]

    Explanation:\[\: \frac{15}{5}=3\](दशांशानंतर समान संख्‍या म्‍हणून दशां रद्द)


    2) \[\: \frac{0.8}{1.6}\times \frac{0.16}{0.08}=?\]

      Explanation:\[\: \frac{8}{16}\times \frac{16}{8}=1\](दशांश समान आहेत म्‍हणून रद्द)


      3)\[\: \frac{1.5}{0.3}=?\]

      Explanation:\[\: \frac{15}{3}=5\]


      4)\[\frac{0.15}{0.3}=?\]

      Explanation:\[\frac{15}{3}=5=0.5\](दशांशानंतर अंशात जास्‍त संख्‍या 1 ने म्‍हणून दशांश डावीकडे 1 ने सरकतो)


      5)\[\frac{2.4\times 5.6}{28\times 0.12}=?\]

        Explanation:\[\frac{24\times 56}{28\times 12}=4=400\](छेदात दशांशानंतर 2 संख्‍या जास्‍त म्‍हणून उत्‍तरावर दोन शुन्‍य द्यावे)


        6) \[\frac{0.8\times 0.6\times0.5}{0.05\times 0.4\times0.6}=?\]

          Explanation: \[\frac{8\times 6\times5}{5\times 4\times6}=2=20\](छेदात दशांश 1 संख्‍या जास्‍त म्‍हणून उत्‍तरावर 1 शुन्‍य)