1) एका संख्येच्या 30% मध्ये त्याच संख्येचे 40% मिळविल्यास 28 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Explanation: 30% + 40% = 28
70% = 28
100% = x } तीरपा गुणाकार
X x 70 = 100 x 28\[x=\frac{100\times 28}{70}=40\]
2) एका संख्येच्या 40% मधून त्याच संख्येचे 10% कमी केल्यास उत्तर 12 येते तर ती संख्या कोणती?
Explanation: 40% - 10% = 12
30% = 12
100% = x } तीरपा गुणाकार
X x 30 = 100 x 12
\[x=\frac{100\times 12}{30}=40\]
3) A ला B पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर B ला A पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? (तलाठी चंद्रपूर 2011)
Explanation: (100×%)⁄ (100+%) (प्रथम जास्त नंतर कमी असल्यास) \[\frac{100\times 10}{100+10}=\frac{1000}{110}=9\frac{1}{11}\]%
4) A ची उंची B च्या उंचीपेक्षा 20% ने कमी आहे तर B ची उंची A च्या उंचीपेक्षा किती टक्के जास्त आहे.
Explanation: (100×%) ⁄ (100-%) (प्रथम कमी नंतर जास्त असल्यास) \[\frac{100\times 20}{100-20}=\frac{2000}{80}\] =25%
5) नागपूरची लोकसंख्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षा 30% ने कमी आहे तर मुंबईची लोकसंख्या नागपूरच्या लोकसंख्येपेक्षा किती टक्के कमी आहे?
Explanation: (100×%)⁄(100-%) \[\frac{100\times 30}{100-30}=\frac{3000}{70}\]=42.85%
6) एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले तर या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले?
Explanation:गणित + Eng – दोन्ही = नापास
30 + 20 – 10 = 40% नापास
∴ 100 – 40 = 60% पास
100 - 40 = 60% पास
7) एका परिक्षेत 40% मुले इतिहासात पास झाले व 30% मुले भुगोलात पास झाले. दोन्ही विषयात 10% पास झाले. जर पास होणारे विद्यार्थी 2400 असतील तर एकूण परिक्षेला बसलेले विद्यार्थी किती?
Explanation: इतिहास + भुगोल – दोन्ही = पास
40 + 30 – 10 = 60% पास
नापास = 100 – 60 = 40% नापास मुले
पास झालेले 60% = 2400
एकूण मुले 100% = x } तीरपा गुणाकार
X x 60 = 100 x 2400\[x=\frac{100\times 2400}{60}\]=4000 मुले
8) एका परिक्षेत 70% विद्यार्थी गणितात पास झाले व 60% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. दोन्ही विषयात 45% विद्यार्थी नापास झाले तर या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले.
Explanation:
गणित = 70% पास ∴ 30% नापासEng = 60% पास ∴ 40% नापास
दोन्ही = 45% नापास ∴ 55% पास
याप्रमाणे घ्यावे
पास = 70 + 60 – 55 = 75% पास
नापास = 30 + 40 – 45 = 25% नापास
9) किराणा सामानाच्या किंमती 25% ने वाढल्यामुळे घरात किती टक्के किराणा सामान कमी वापरावा म्हणजे खर्चात बदल होणार नाही?
Explanation: (100×%) ⁄(100+%) \[\frac{100\times 25}{100+25}=\frac{2500}{125}\]=20%