* प्राचीन इजिप्तमधील अभ्यासकांनी सर्वप्रथम भुमीतीचा अभ्यास केला.
* विशिष्ठ प्रकारच्या रेषीय भौगोलिक आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सुत्रे “बॉबीलोनियन” ने शोधून काढली.
* ‘युक्लीड’ भुमितीचा जनक होय. (ग्रीक गणितत्ज्ञ)
* शुन्याचा शोध आर्यभट्ट ने लावला. (शुन्याचा शोध भारतात लागला)
* प्राचीन भारतींना देखील भुमिती विषयाचे सखोल झान होते.
* प्राचीन बौद्धायनच्या शुल्क सुत्रात अनेक भौमितीक आकृत्यांच्या क्षेत्रफळ काढण्याच्या सुत्रांचा व पायथागोरसच्या प्रमेयाचा समावेश आहे.
* चक्रीय चौकोनाच्या बाजुच्या साहाय्याने क्षेत्रफळ काढण्याच्या पद्धतीचा अभ्यास ‘चंद्रगुप्त’ या प्राचीन गणितत्ज्ञाने केला.
* ‘भास्कराचार्य’ (द्वितीय) यांनी प्रमेयाची टिकात्मक सिद्धता दिली.
* आर्यभट्टांनी समाजभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ मनोर्याचे क्षेत्रफळ काढण्याची सुत्रे काढली.
* आर्यभट्टांनी II ची अंदाजे किंमत काढली. उदा. II = 3.14
OR 22 ⁄7
* इ.स. पूर्व तिसर्या शतकातील ग्रीक गणिती युक्लीडने काही सोपी व सुसक्ष विधाने सत्य आहेत. असे मानले तर इतर गुणधर्म तर्फ संगतीने सत्य आहेत हे सिद्ध करता येते असे दाखवून दिले.
भुमितीतील मूलभूत संबोध
1) बिंदू (Point) =
अतीशय अनकुचीदार टोकाने काढलेले टिंब म्हणजे बिंदू होय. ●
2) रेषा (Line) =
दोन्ही बाजुला अमर्याद वाढते तीला रेषा म्हणतात. रेषेची लांबी मोजता येत नाही. कोणत्याही दोन बिंदूतून एकरेषा काढता येते.
3) रेषाखंड (Segment) =
रेषेवरील मर्यादित भागाला रेषाखंड म्हणतात. रेषाखंडाची लांबी मोजता येते.