1) एका चौकोणाचे चार कोण अनुक्रमे 60, 80, 90 व x आहेत तर x = ?
Explanation: 60 + 80 + 90 + x = 360
230 + x = 360
x = 360 – 230 = 130
2) एका चौकोणाचे चार कोण 1:2:3:4 या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Explanation: x + 2x + 3x + 4x = 360
10x = 360
x = 36°
मोठा कोण = 4x
4 x 36 = 144°
3) एका चौकोणाचे बाह्यकोण अनुक्रमे (2x+15)°, (x+45)° 3x व (2x+10)° मापाचे आहेत तर त्या चौकोणाच्या सर्वात लहान आंतरकोणाचे माप काढा.
Explanation: 2x – 15 + x + 45 + 3x + 2x + 10 = 360
8x + 40 = 360
8x = 360 – 40
8x = 320
x = 320/8
x = 40°
सर्वात मोठ्या बाह्यकोणाच्या आंतरकोणाचे माप कमी असते
3x = 3 x 40 = 120° बाह्यकोण
लहान = 180 – 120 = 60° आंतरकोण
4) 4) खालीलपैकी सत्य विधाने कितीते ओळखा.
1) चौरसाचे कर्ण एकरूप नसतात.
2) पतंगाचे दोन्ही कर्ण एकमेकांना काटकोणात दुभागतात.
3) समांतरभुज चौकोणाचे लगतचे कोण पूरककोण असतात.
4) आयताचे प्रत्येक कोण काटकोण नसतात.
Explanation: यात फक्त विधान 3 बरोबर आहे.