तीन नैकरेषीय बिंदूना जोडून तयार होणारी आकृती म्हणजे
त्रिकोण होय.
प्रकार
1) बाजुवरून प्रकार:-
A) समभुज त्रिकोण :- ज्या त्रिकोणाच्या तीन्ही बाजु समान किंवा
एकरून असतात. त्यांना समभुज त्रिकोण म्हणतात.
* समभुज त्रिकोण नेहमी लघुकोण असतो.
* समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण नेहमी 600 असतात.
B) समद्विभुज
त्रिकोण :- ज्या
त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजु समान असतात त्यांना समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात.
* समद्विभुज
त्रिकोणातील समान बाजुं समोरील कोण नेहमी समान मापाचे असतात.
* समद्विभुज त्रिकोण लघुकोण त्रिकोण, काटकोण त्रिकोण किंवा लघुकोण त्रिकोण असु शकतो.
C) विषमभुज
त्रिकोण:- ज्या
त्रिकोणाच्या तिन्ही बाजु असमान मापाच्या असतात त्यांना विषमभुज त्रिकोण म्हणतात.
* विषमभुज
त्रिकोणाचे तिन्ही कोण वेगवेगळ्या मापाचे असतात.
* विषुमभुज
त्रिकोण लघुकोण त्रिकोण, काटकोण
त्रिकोण किंवा विशालकोण त्रिकोण असतो.
* त्रिकोणाच्या
कोणत्याही दोन बाजु दुभाजकांच्या छेदन बिंदूना परिकेंद्र म्हणतात.
* त्रिकोणाचा शिरोबिंदू व परिकेंद्र यामधील अंतर
घेऊन वर्तुळ काढल्यास त्याला परिवर्तुळ म्हणतात.
* परिवर्तुळ त्रिकोणाच्या तीन बिंमधून जाते.
2) कोणांवरून प्रकार:-
D) लघुकोण त्रिकोण:-
ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण 900 पेक्षा कमी असतात त्यांना लघुकोण म्हणतात.
* लघुकोण त्रिकोण विषमभुज त्रिकोण असु शकतो.
* लघुकोण त्रिकोण त्रिकोण असु शकतो.
|
B |
|
C |
|
A |
E) काटकोण त्रिकोण:-
ज्या त्रिकोणाचे एक कोण काटकोण म्हणजे 900 असते त्यास काटकोण
त्रिकोण म्हणतात.
* काटकोण त्रिकोणाचे इतर दोन लघुकोण असतात.
* काटकोण त्रिकोणाचे इतर दोन कोण नेहमी कोटीकोण
असतात.
* काटकोण त्रिकोणात 900 समोरीलबाजु
नेहमी कर्ण असते. काटकोण त्रिकोण विषमभुज किंवा समभुज त्रिकोण असु शकतो.
|
C |
|
A |
|
R |
|
|
|
|
F) विशालकोण त्रिकोण:-
ज्या त्रिकोणाचा एक कोण 900 पेक्षा जास्त असतो. त्यास विशाल कोण म्हणतात.
व त्या त्रिकोणास विशालकोण त्रिकोण म्हणतात.
* विशालकोण त्रिकोणात इतर दोन कोण नेहमी लघुकोण
असतात व ते परपरांचे कोटीकोण नसतात.
* विशालकोण त्रिकोण विषमभुज त्रिकोण असु शककतो
किंवा समद्विभुज त्रिकोण असु शकतो.
* विशालकोण त्रिकोण कधीही समभुज त्रिकोण नसतो.
* विशालकोण त्रिकोणात विशालकोणासमोरील बाजु सर्वात मोठी असते.
* त्रिकोणाचे
कोणतेही दोन कोण दुभागल्यास त्या कोण दुभाजकांच्या छेदनबिंदूला आंतरकेंद्र म्हणतात
व वर्तुळाला आंतरवर्तुळ म्हणतात. आंतरवर्तुळ त्रिकोणनाच्या तीन बाजुंना स्पर्श
करते.
त्रिकोणाच्या
एकरूपतेच्या कसोट्या:-
जर एका त्रिकोणाच्या तीन बाजु किंवा तीन कोण
दुसर्या त्रिकोणाच्या तीन बाजु किंवा कोण यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन
त्रिकोण एकरूप असतात.
1) बाकोबा कसोटी:-
जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन बाजु व त्यांनी समाविष्ठ केलेल्या एक कोण हे
दुसर्या त्रिकोणाच्या दोन बाजु व त्यांनी समाविष्ठ केलेल्या कोण यांच्याशी
तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा (बाजु-कोण-बाजु) कसोटीनुसार एकरूप
असतात.
2) बाबाबा
कसोटी :- जेव्हा एका त्रिकोणच्या तिन्ही बाजु ह्या
दुसर्या त्रिकोणाच्या तीन्ही बाजुंशी तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण
बाबाबा (बाजु-बाजु-बाजु) कसोटीनुसार एकरूप असतात.
3) कोबाको कसोटी:- एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ठ केलेली बाजु हे दुसर्या त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ठ केलेली बाजुच्यांशी तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको (कोण-बाजु-कोण) कसोटीनुसार एकरून असतात.
5) कर्णभुजा कसोटी:- एका काटकोण त्रिकोणाचे एक बाजु व कर्ण हे दुसर्या
काटकोण त्रिकोणाच्या एक बाजु व कर्ण यांच्याशी तंतोतंत जुळत असतील तर ते दोन
त्रिकोण कर्णभुज कसोटी म्हणतात.
त्रिकोणाचे गुणधर्म
1) त्रिकोणाच्या तीन्ही कोणांच्या मापाची बेरीज
1800 असते.
2) त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजुसमोरील कोण मोठा
व लहान बाजुसमोरील कोण लहान असतो.
3) शिरोलंब = त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून संमुख
बाजुवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात.
4)
मध्यगांच्या संपातबिंदूला गुरूत्वमध्य
म्हणतात.
5) गुरुत्वमध्य मध्यगेला 2:1 गुणोत्तरात
विभागतो.
6)
कोणाचे माप काढण्याचे सुत्र
(n –
2) ´
180
तिन कोण = त्रिकोण = 180
चार कोण = चौकोण = 360
पंचकोण = 540
सहा कोण = षटकोण = 720
सात
कोण = 900
आठ कोण = अष्टकोण = 1080
|
|