वर्तुळ - Maths & Resoning

वर्तुळ:- (Circle)

   वर्तुळाच्‍या केंद्रबिंदूपासून समान अंतरावरील सर्व बिंदूच्‍या संचाला वर्तुळ असे म्‍हणतात.

 

त्रिज्‍या:- (Radius)

   वर्तुळाच्‍या केंद्रबिंदु पासून वर्तुळावरील कोणत्‍याही बिंदुपर्यंतचे अंतर म्‍हणजे त्रिज्‍या होय.




     
 
1) सर्व त्रिज्‍या समान असतात.

2) एकाच वर्तुळाला अनेक त्रिज्‍या काढता येतात.

3) त्रिज्‍या व्‍यासाच्‍या निम्‍मी असते

.      OA, OC त्रिज्‍या आहेत.

व्‍यास:- (Diameter)

   वर्तुळावरील कोणत्‍याही दोन बिंदूना जोडणार्‍या मात्र केंद्रबिंदूतून जाणार्‍या रेषेला व्‍यास म्‍हणतात.


   काढता येतात. 1) व्‍यास त्रिज्‍येचा दूप्‍पट असतो.

2) एकाच वर्तुळाला अनेक व्‍यास काढता येतात.

3) सर्व व्‍यास समान मापाचे असतात.

      AB = व्‍यास

जिवा :- (Chord)

      वर्स्‍तुळावरील कोणत्‍याही दोन बिंदूना जोडणार्‍या रेषेला जिवा म्‍हणतात.

1) सर्व जिवा असमान मापाच्‍या असतात.

2) एकाच वर्तुळाला अनेक जिवा काढता येतात.

3) सर्वात मोठ्या जिवेला व्‍यास म्‍हणतात.

4) एकाच वर्तुळाच्‍या एकरूप जिवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात.

जिवा AB, जिवा CD

अर्धवर्तुळावरील कोण:-

   अर्धवर्तुळावरील कोण नेहमी काटकोण असतो. अर्धवर्तुळ 1800 चा असतो व अर्धवर्तुळावरील कोण 900 असतो.

M<ABC =90

चक्रीय चौकोण:- (Cyclic quadrangle)

      ज्‍या चौकोणाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्‍यास चक्रीय चौकोण म्‍हणतात. चक्रीय चौकोणाचे संमुख कोण पुरक असतात.

एकरूप वर्तुळे:- समान त्रिज्‍येचे वर्तुळ एकरूप असतात.

कंसातील कोण:- एकाच कंसातील कोण नेहमी एकरूप असतात.

आंतरलीखील कोण:- <PQR आंतरलीखीत आहे. आंतरलिखीत कोणाचे माप त्‍याने आंतरखंडीत केलेल्‍या कंसाच्‍या निम्‍ये असते.
m<PQR = 1/2 m (कंस P and R)