निर्देशक भुमीती - Maths & Resoning


1)      संख्‍यांरेषेवर 0 या वास्‍तव संख्‍येशी निगडीत असलेल्‍या बिंदूला आरंभबिंदू म्‍हणतात.


2)      संख्‍यारेषेवर कोणत्‍याही बिंदूशी निगडीत असलेल्‍या संख्‍येला त्‍या बिंदूचा निर्देशक म्‍हणतात.


3)      संख्‍येशी निगडीत बिंदूला त्‍या संख्‍येचा आलेख म्‍हणतात.


4)      आडव्‍या रेषेला X-अक्ष व उभ्या रेषेला Y-अक्ष म्‍हणतात.


5)      Y अक्षावरील प्रत्‍येक बिंदूचा x – निर्देशक 0 असतो (0, y)


6)      x अक्षावरील प्रत्‍येक बिंदूचा y – निर्देशक 0 असतो (x, 0)


7)      आरंभबिंदूचे निर्देशक (0, 0) असतात.


8)      संख्‍यारेषेवर उजव्‍या बाजुला धन व डाव्‍या बाजुला ॠण संख्‍या असतात.


9)     खालील चार्टाला कोटीशियन चार्ट म्‍हणतात. तो चार भागात विभागला जातो. या प्रत्‍येक भागाला चरण म्‍हणतात.