अक्षरमाला - Maths & Resoning

अक्षरमाला

 इंग्रजी वर्णमालेवर आधारित या भागावर परीक्षेत बरेच प्रश्न विचारले जातात. या भागावरचे प्रश्न एका अक्षरांची मालिका किंवा अक्षरगटांची मालिका निर्माण होऊन बनतात, या अक्षरगटांमध्ये काही विशिष्ट संबंध असतो. प्रश्नात मालिकेतील काही पदे दिलेली असतात व गाळलेल्या ठिकाणचे पद आपणास शोधावयाचे असते. दिलेल्या पदांवरून, अक्षरांचा किंवा अक्षरगटाचा क्रम लक्षात घेऊन त्याच क्रमात गाळलेल्या ठिकाणी काय येऊ शकेल याची पर्यायातून निवड करणे आवश्यक असते.

या प्रकारात 1, 2, 3, 4, 5 किंवा 6 अक्षरांची, विशिष्ट क्रमाची मांडणी A कडून Z कडे (सुलट) किंवा 7 कडून A कडे जाणारी (ऊलट)मांडणी एका आड एक अशा दोन मालिकांची किंवा तीन मालिकांची गुंफण, अक्षरांसोबतच कधी कधी अंकाचा वापर अशा विविध प्रश्नांचा समावेश होतो.

अशा प्रकारच्या प्रश्नात A,B,C,..........X,Y,Z. नंतर पुन्हा A,B,C..... अशी सुरूवात होते. म्हणजेच नंतर शेवट न होता मालिका पूढे सलग सुरू राहते.

परिक्षेचा दबाव/ताण, प्रश्न सोडवायला मिळणारा वेळ याचा विचार करता अचूकता व वेळेची बचत साधण्यासाठी वर्णमालेच्या खालील मांडणीचा परीक्षेत मोठ्या प्रमाणात वापर होतो. कच्च्या कामासाठी असणाऱ्या जागेत हे लिहुन ठेवल्यास या प्रकरणासोबतच परस्परसंबंध, सांकेतिक लिपी या प्रकरणातही याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
A B C D E F G H I J K L M
26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14
Z Y X W V U T S R Q P O N