विसंगत / विजोड पद ओळखणे - Maths & Resoning
 विसंगत / विजोड पद ओळखणे
या भागावरील प्रश्नांचे स्वरूप नावावरूनच समजते. अशा प्रकारच्या प्रश्नात चार विविध गट दिलेले असतात, त्यापैकी तान गट एका विशिष्ट नियमाने बनलेले असतात मात्र चौथा गट वेगळ्याच प्रकारे बनलेला असतो तो गट शोधणे व पर्यायातून निवडणे.
काही वेळा एखादी सलग क्रमवार अक्षरमाला/ विविध अक्षरगटांची मालिका दिलेली असते व त्या मालिकत एखादे पद/ गट वेगळ्याच क्रमाने आल्याने विसंगत असते ते शोधणे असे प्रश्नाचे सर्वसाधारण स्वरूप असते.
विसंगत घटक शोधत असताना पदांमधील एक सारखेपणा, (साधर्म्य) शोधण्यासाठी विविध आधार वापरता येतील.
1) वर्णमालेतील मुळाक्षरांचा क्रम वापरून बनलेले गट
★ A पासुन Z पर्यंत सुलट क्रमाने
★ Z कडुन A कडे ऊलट क्रमाने
★ 1, 2, 3 इ. अक्षरे वगळून (चढत्या क्रमाने वगळणे)
★ प्रत्येकी 2; किंवा 3, किंवा 4 इ. वगळुन (समान वगळणे)
★ 4, 3, 2, इ. क्रमाने अक्षरे वगळून (उतरत्या क्रमाने)
2) वर्णमालेतील मुळाक्षरांची विविध प्रकारे मांडणी / रचना
उदा. 1) ABDC, EFHG, IJLK, MNOP
विसंगत -MNOP
CBA, FED, THG, JKL या प्रमाणे
विसंगत -JKL
(3) कॅपीटल व स्मॉल अक्षरांचा वापर व त्यांचे स्थान (Position)
उदा. 1) mNo, pQr, sTu, vWx, YxA
विसंगत -YxA
2) Def, ghi, jkL, mnO, pqR
विसंगत - DEF
4) स्वरांचा वापर असणे / नसणे.
उदा. AEO, IUA, PUE, OEU
विसंगत - PUE,
5) उच्चार साधर्म्य अक्षर संख्या साधर्म्य, व्यंजनांचा अनेक वेळा वापर किंवा पुनरावृत्ती अशा अनेक आधार म्हणुन वापरता येतील.
उदा. RAT, MAT, BAD, CAT
विसंगत- BAD

लक्षात ठेवा

विसंगत घटक शोधताना, घाईत वेळ वाचविण्यासाठी एक पहिला गट.पाहून त्यानुसार लगेचच आढळल्यास तो विसंगत समजण्याची चूक करू नये, विसंगत घटक सापडण्यासाठी दिलेल्या गटांपैकी किमान दोन गटात साधर्म्य असलेच पाहिजे हे लक्षात